सारा तेंडुलकरच्या फेक अकाऊंटवरून शरद पवारांवर टीका !

सारा तेंडुलकरच्या फेक अकाऊंटवरून शरद पवारांवर टीका !

मुंबई : ट्विटरवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावाने एक फेक अकाऊंट बनवण्यात आले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर या अकाऊंटवरुन टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण केंद्रालाही त्यांनी लुटायचा प्रयत्न केला, हे फारसे जगजाहीर नसल्याचे ट्वीट ९ ऑक्टोबर रोजी या अकाऊंटवरुन करण्यात आले होते. शरद पवारांचे नाव विजय माल्ल्याने घेतल्याच्या चर्चांवरुन हे ट्वीट करण्यात आल्याचा अंदाज आहे.

ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. हे फेक अकाऊंट कोणाचे आहे, ते शोधून तक्रार करावी, असेही आव्हाडांनी सांगितले आहे. फेक अकाऊंटवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आव्हाडांनी दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली आहे.

COMMENTS