नाशिक – शेतकऱ्याच्या कर्जमाफीला भाजपचा विरोध नाही. परंतु योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवार सभेत ते बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, गोविंद केंद्रे , खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दादाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील , नाशिक जिल्हा यूवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या समस्या व सरकारकडून काय अपेक्षित आहे याबाबत प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या सांगितल्या.
यामध्ये शेती औषधे व बियाणांची एम. आर. पी. दर निश्चित करावे. तसेच जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांची कष्टाची रक्कम असुन त्याला त्याचीच रक्कम काढणे जिकिरीचे झाले असल्याने तो अडचणीत सापडला असल्याने जिल्हा बँकेच्या व्यवहार सुरू करावा.
दरम्यान, शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सांगताना एका शेतकऱ्याने आमच्या मुलांना लग्नासाठी कोणी मुलगीही देणे पसंत करीत नाहीत साहेब अशी परिस्थिती आमची झाली असल्याची व्यथा मांडली.
त्यानंतर लगेचच खतवड येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी, ‘साहेब मी भाजपचाच कार्यकर्ता असून मी प्रत्येक वेळी भाजपलाच मतदान करत, पण साहेब आपण आपल्या मुलाच्या लग्नासाठी किती खर्च केला ? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारताच उपस्थितांत एकच हशा पिकला. यावर दानवेंनी काही न बोलता स्मितहास्य करणेच पसंत केले.
COMMENTS