मुंबई – मुंबईतील सिद्धीविनायक देवसस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची निवड झालीय. मात्र ही निवड रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून राणे यांनी बांदेकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केलीय. आदेश बांदेकर यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामाचा अनुभव नाही. तसंच ते एका पक्षाची संबधित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निपक्षपाती काम होणार नाही. सिद्धीविनायक ट्रेस्ट हे गोरदरीबांना मदत करते. या पदाला बांदेकर न्याय देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी असंही पत्रात म्हटलंय.
Newer Post
पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री
COMMENTS