“सुनील शितपने “त्यांना” रिव्हॉल्वर दाखवली होती”

“सुनील शितपने “त्यांना” रिव्हॉल्वर दाखवली होती”

मुंबई – ‘घाटकोपर  इमारत दुर्घटना प्रकरणी लोक तक्रार करायला गेले तर शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितपने त्यांना रिव्हॉल्वर दाखवली’. असा गंभीर आरोप आज विधानसभेच्या कामकाजात मुंबईतील भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केला आहे.

यावेळी पुरोहित म्हणाले, ‘तुम्ही घराबाहेर वीटा, रेती ठेवा तिथे नगरसेवक पोहचतो.  माझ्या विधानसभेत शेकडो इमारतींचे अनधिकृत काम सुरू आहेत. मुंबई आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत, पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नाही. ही महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही का ?’

‘घाटकोपर प्रकरणात लोक तक्रार करायला गेले तर शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितपने त्यांना रिव्हॉल्वर दाखवली. जिथे जिथे अनधिकृत काम सुरू आहे, जिथे इमारतींना धोका आहे त्याचा सर्व्हे करा.  ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची तपासणी करावी. ज्या ठिकाणी कारवाई झाली नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अधिकारी कोट्यवधी रुपये कमवत आहेत.  धोकादायक इमारतीतील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’. अशी मागणी राज पुरोहित यांनी केली आहे.

 

 

COMMENTS