मुख्यमंत्र्यांच्या “त्या” अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या कॅप्टनचे लायसन्स निलंबित !

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या कॅप्टनचे लायसन्स निलंबित !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला 25 मे 2017 (गुरूवारी) रोजी लातूरमध्ये अपघात झाला होता. याप्रकरणी कॅप्टन संजय कर्वे आणि मोहित शर्मा यांचे लायसन्स हक्क Director, Air Safety, DGCA, New Delhi यांनी जनहितावच्या दृष्टीने चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. आज विधानपरिषदेमध्ये प्रश्नोत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी माहिती दिली.

25 मे रोजी लातूर दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस हे निलंग्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. हेलिपॅडची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. यावेळी हा अपघात झाला होता. हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले. सुदैवाने हेलिकॉप्टर खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळले. उड्डाण केल्यानंतर लाईटच्या तारेला हेलिकॉप्टरचा काही भाग लागल्यामुळे हा अपघात झाला होता.  या अपघातातून मुख्यमंत्री फडणवीस थोडक्यात बचावले होते.

COMMENTS