सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार?

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार?

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी आज (सोमवार) त्यांच्या निवासस्थानी हिंदु मक्कल कातची (हिंदु पीपल्स पार्टी) पक्षाचे सरचिटणीस रविकुमार व पक्ष नेते अर्जुन संपथ यांची भेट घेतली.  काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी धीर धरा, आपल्या कामांवर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा’, अशा शब्दात राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आता अर्जुन संपथ यांच्याशी झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

“रजनीकांत यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मला तमिळनाडू व देशासाठी काहीतरी करावयाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करण्याच्या पर्यायाचा ते नक्कीच विचार करतील,” असे संपथ यांनी भेटीनंतर  बोलताना सांगितले.

रजनीकांत यांना कालच नद्याजोड प्रकल्पास पाठिंबा दर्शविताना यासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या राजकारणात पदार्पण करण्याच्या शक्‍यतेस आणखी बळ मिळाले आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणालेत,’ तामिळनाडू मध्ये भाजपची स्थिती चांगली नाही. जर रजनीकांत हे राजकारणात येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे भाजपात स्वागत आहे.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,’ लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांचे राजकारणात स्वागत आहे. त्यांनी भाजपचा नक्की विचार करावा,  त्यांना पक्षात चांगले स्थान मिळेल असं ही ते म्हणाले होते.

COMMENTS