सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. मात्र मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा फेटाळलाय.

नाशिक जिह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. राजीनामा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती सुभाष देसाईंनी बोलताना दिली.

 

COMMENTS