मुंबई – बीड झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपला मदत करणा-या माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केलीय. धस यांच्या रक्तातच विश्वास घात आहे अशा शब्दात मुंडे यांनी धस यांच्यावर हल्लाबोल केला. 2005 मध्ये धस भाजपात होते तेंव्हा त्यांनी असेच केले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. आता राष्ट्रवादीत असताना त्यांनी भाजपला मदत केली आहे. सुरेश धस यांची कृती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचा विश्वासघात आहे. तो बीडच्या जनतेचाही विश्वासघात असल्याची टीका मुंडे यांनी केलीय. माझ्यावर टीका करायचीच होती तर मला प्रचारासाठी का बोलावले. प्रचारापर्यंत मी चांगला होतो. आणि आताच वाईट कसा झालो असा सवालही मुंडे यांनी केलाय.
काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धस यांच्या समर्थक सदस्यांनी भाजपला पोषक ठरेल अशी भूमिका घेतली. त्यामुळे बहुमत हाती असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. जिल्ह्यातील नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षाही मोठे झाले आहेत. त्यामुळे आपण अशी भूमिका घेत असल्याचं सांगत सुरेश धस यांनी काल धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आज धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.
COMMENTS