सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार ?

सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार ?

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी आज राजीनामा दिला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना वेटिंग लिस्टवर टाकलं आहे. मात्र लवकरच मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभू यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत. सुरेश प्रभूंकडे पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तरप्रदेशात आठवडाभरामध्ये सलग दोनदा भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुरेश प्रभूंनी पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केला. मात्र, पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींनंतर सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

COMMENTS