गोवा : पणजीत 62.25 % तर वाळपईत 69.05 % मतदान

गोवा : पणजीत 62.25 % तर वाळपईत 69.05 % मतदान

पणजी मतदारसंघात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 62.25 % तर वाळपई मतदारसंघात 69.05 % मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. शेवटच्या टप्प्यात मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

वाळपई मतदारसंघातील काही भागांमधील आकड़ेवारी उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे वाळपईची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपली. त्याची आकडेवारी रात्री उशिरा उपलब्ध होणार आहे.

 

COMMENTS