मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या समग्र तटकरे या पुस्तकाचं प्रकाशन काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
या कार्यक्रमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. सुशीलकुमार शिंदे यांनी आधी पवारांना चिमटे काढले. पवारांनी जनसंघालाही सोडले नाही, पवारांना मी खूप जवळून पाहिले आहे परंतु व्यासपीठावरुन काय सांगू असं सांगत जाहीररित्या सांगणं अडचणीचं आहे अशा शब्दात त्यांनी पवारांना चिमटे काढले.
तसंच मी पवारांचे ट्रेनिंग घेतले म्हणूनच एवढा मोठा झालो. नाहीतर जिल्हा परिषदेत राहिलो असो किंवा फौजदार म्हणून पवारांना सॅल्युट मारत बसलो असतो असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले. पवारांना माणसांची पारख आहे तसंच लोकांना मोठं करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे असही सुशीरकुमार शिंदे म्हणाले. त्यामुळे तटकरे शरद पवारांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्याबरोबर गेले आणि मोठे झाले असं सांगत तटकरेंच्या यशात पवारांचा वाटा असल्याचं सांगितलं.
त्यानंतर पवारांनी शिंदे यांच्या भाषणाचा आधार घेत शिंदेना टोले हाणले. शिंदे म्हणाले पवारांनी माणसं हेरली. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी राजकारणातील लोकांचे काम बघतो ते हेरतो आणि त्यांना संधी देतो. मण इतर माणसं हेरण्याचं काम मी केलं नाही. शिंदे साहेब पोलीस खात्यात होते. त्यांची नजर चौफेर असेत तशी नजर मला नव्हती. माझे लग्न आई वडिलांनी जमवले. शिंदे साहेबांची नजर चौफेर नजर कुठेतरी पडली आणि ते प्रमात पडले असं सांगर माणसं हेरण्यामध्ये आमच्या दोघांत हा फरक होता या शब्दात पवारांनी शिंदेंची फिरकी घेतली.
COMMENTS