‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही गाजत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच टोमणे मारले आहेत. ‘सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?’ अशी सुरुवात करत ‘देवेंद्र, आता तरी खरं बोल – खरं बोल’ असं म्हणत जयंत पाटलांनी शिवसेना-भाजपवर टीका केली.
जयंत पाटील यांची विधानसभेतील कविता
लाचार सत्तेसाठी झोल झोल झोल झोल
जनतेचा वाजतोय ढोल ढोल ढोल ढोल
देंवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल गोल गोल
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय
सेनेला दिलय गाजर गाजर
गाजराचा आकार कसा लांब लांब लांब लांब
देवेंद्र तुझ्या कामास म्हणतोय थांब थांब थांब थांब
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय
सेनेचा इथ सभेत नखरा नखरा
वाघाचा झालाय बघा बकरा बकरा
देवेंद्र उद्धवशी कधी तरी गोड बोल गोड बोल
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय
……….आणि जर असच आहे तर
देवेंद्र सेनेवर घाव खोल घाव खोल
सत्तेत राहून त्यांचा शुन्य रोल शुन्य रोल
देवेंद्र काहीतरी खरं बोल खरं बोल
सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय
सेनेचा भांडा आता खोल खोल खोल खोल
आता तरी त्यांची साथ सोड सोड सोड सोड
सत्तेचे नाही काही मोल मोल मोल मोल
देवेंद्र आता तरी खरं बोल खरं बोल
COMMENTS