सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत, सोबत राहुलही

सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत, सोबत राहुलही

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही जाणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिलीय. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतही सोनिया गांधी प्रचारात उतरल्या नव्हत्या. काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सपाटून मार खावा लागला. या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यातच गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष होऊनही पक्षाला सरकार स्थापन करण्यात यश येऊ शकलं नाही. त्यामुळे पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS