सोनिया गांधी यांच्या जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता !

सोनिया गांधी यांच्या जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता !

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एसपीजी कमांडो बेपत्ता आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा कमांडो बेपत्ता आहे.  दिल्ली पोलीस या कमांडोचा शोध घेत आहेत.

सोनिया गांधीच्या सरकारी निवासस्थन 10 जनपथमध्ये  हा एसपीजी कमांडो तैनात होता आणि तो 3 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. तुघलक रोड पोलिस या कमांडोचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हा एसपीजी कमांडो वर्दी घालून 10 जनपथवर दाखल झाला, त्या दिवसी तिथे त्याची डय़ूटीही नव्हती. डय़ूटी नसतानाही सरकारी वर्दीत सोनिया गांधींच्या निवास्थानी पोहोचल्यानंतर तो गायब कसा झाला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

COMMENTS