मुंबई महापालिकेत दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटले आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत सामिल करून घेण्यात अनिल परब यांचा मोठा हातभार लागला आहे. “आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि मनसेचा एक गट शिवसेनेत विलीन झाला आहे. ज्यांना मूळ पक्षात परत येण्याची इच्छा होती, त्याला मी फक्त कायदेशीर स्वरुप दिलं,” असं अनिल परब म्हणाले.
किरीट सोमय्यांची गणितं म्हणजे ‘मुंजेरीलाल के हसीन सपने’ ह्या म्हणीप्रमाणे आहेत. त्यांचं स्वप्न भंग झालंय, त्यांचं दुःख मी समजू शकतो.”, असा टोला परब यांनी लगावला.
भाजप नेते मनोज कोटक यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. “आमचे नगरसेवक पैशांअभावी हरले. वडापाव खाऊन काम करणारा शिवसैनिक घोडेबाजार काय करणार? पैसे असते तर ह्यांची सत्ता उलथवून लावायला वेळ लागणार नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागतातच,” असं परब म्हणाले.
COMMENTS