हिमाचल प्रदेशासोबत गुजरातच्या निवडणुका जाहीर का झाल्या नाहीत ? काँगेसचा गंभीर आरोप !

हिमाचल प्रदेशासोबत गुजरातच्या निवडणुका जाहीर का झाल्या नाहीत ? काँगेसचा गंभीर आरोप !

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकत्र जाहिर होण्याची अपेक्षा होती. गेल्यावेळीही दोन्ही राज्यातल्या निवडणुका एकत्र जाहीर झाल्या होत्या. यावेळी मात्र तसं झालं नाही. केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या. नरेंद्र मोदींच्या इशा-यावर निवडणूक आयोग चालत असल्यामुळेच गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत असा गंभीर आरोप काँग्रेसचे गुजरात प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी केला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यास भाजप हरण्याची भीती मोदींना सतावते आहे. त्यामुळे त्यांनी आयोगावर प्रभाव पाडून निवडणुकीची घोषणा पुढे ढकलली आहे. पंतप्रधान उद्या गुजरातच्या दौ-यावर जाणार आहेत. त्या दौ-यात ते मोठ्या घोषणा करणार आहेत. त्यासाठीच निवडणूक आयोगाने मोदींनी ही सवलत दिल्याचा गंभीर आरोप सातव यांनी केला आहे. आयोगाने लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS