पंढरपुरच्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यास प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. मात्र काही दिवसांपूर्वी आश्चर्यचकित करणारा एक प्रकार समोर आला आहे. या वारकऱ्यांसोबत सहभागी झालं होतं एक हरीण. हे हरीण पंढरपूरच्या दिंडीत वारकऱ्यांच्या बरोबर पायी चालत चालत टाळ व मुरदंगाच्या तालावर वारीला निघाले असा प्रसंग खूप दुर्मिळ असतो. या हरीणाचे गेल्या काही दिवसांपासून कौतुक होत आहे. हे हरीण वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला निघाले आहे.
श्री क्षेञ अटाळी ता खामगाव जि. बुलढाणा येथे संत भोजणे महाराज संस्थान आहे. या संस्थानचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा.ना भाऊसाहेब फुंडकर हे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 15 वर्षा पासून आषाढी एकादशी निमित्ताने अटाळी ते पंढरपूर पायदळ वारी जात असते,मागील दोन वर्षां पासुन एक हरीण जंगल परिसरातून दिंडी सोबत येत असते. या वर्षी 19 जून 2017 पासुन दिंडी मध्ये सोबत असुन कीर्तनात सुद्धा हजेरी लावत असते. एकदा तरी आपण वारी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण या वारीत चक्क हे हरिण सहभागी झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह आहे. वारकरी देखील या हरिणाला आपल्या सोबत घेऊन वारीचा आनंद लुटत आहेत.
COMMENTS