उस्मानाबाद : तहान लागली की विहिर खोदाई करणारे हे शासन असून शासनाची शेतकऱ्यांच्या प्रति उदासीनता दिसून येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. रविवारी उस्मानाबादमध्ये झालेल्या मेळाव्यात पवार म्हणाले की जाहीरातबाजी करीत पैशाची उधळपट्टी करणारे हे सरकार आहे. शेतकऱ्दयांना कर्जमाफी असो की 10 हजार रुपयांची मदत असेल, दररोज वेगळेच नियम काढीत आहेत. खऱ्या गरजूंनाचा द्या, पण द्या की लवकर, असे म्हणत शासनाच्या निर्णयक्षमतेवर टीका करीत तहान लागली की विहिर खोदाई करणारे शासन असल्याचे पवार यावेळी म्हणाले. योजना कशाही तयार केल्या जातात. मागेल त्याला शेततळे योजना आणली अन शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याच निर्णय घेतला. ह्यांच्या काकांनी 50 हजार रुपयांत शेततळे केले होते का, असे म्हणत शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, डाॅ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, जीवनराव गोरे हे यावेळी उपस्थित होते.
COMMENTS