राज्यातील ११६ शाळांना मिळणार प्रत्येकी २० लाख रुपये !

राज्यातील ११६ शाळांना मिळणार प्रत्येकी २० लाख रुपये !

मुंबई – नीती आयोगाने जाहीर केलेल्या राज्यातील दुस-या टप्प्यातील एकूण ११६ शाळांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. नीती आयोगाअंतर्ग सुरु कऱण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात या ११६ शाळांचा समावेश कऱण्यात आला आहे. त्यामुळे या प्रत्येक शाळांना केंद्र सरकारच्या शिखर संस्था असलेल्या नीती आयोगाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुस-या यादीत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ११ शाळांचा समावेश आहे  तर मुंबई शहर व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १० शाळांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय निवडलेल्या शाळा  

अहमदनगर-४, अकोला-१, अमरावती-६, बीड-१, बुलडाणा-४, चंद्रपूर-१, धुळे-२, गडचिरोली-२, गोंदिया-७, हिंगोली-१, जळगाव-३, जालना-१, कोल्हापूर-१०, लातूर-४,  मुंबई शहर-१०, मुंबई उपनगर-४,  नागपूर-७, नांदेड-१, नंदुरबार-१, नाशिक-५, उस्मानाबाद-२, पुणे-११, रायगड-२, रत्नागिरी-२, सांगली-२, सातारा-८, सोलापूर-२, ठाणे-३, वर्धा-२, वाशीम- ४ आणि यवतमाळ-३

या सर्व जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना केंद्र सरकारच्या निती आयोगाकडून 20 लाखांचं आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

 

 

https://twitter.com/MahaDGIPR/status/946710795924029440

https://twitter.com/MahaDGIPR/status/946712712297431040

 

COMMENTS