14 मे पासून ‘या’ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी राहणार बंद

14 मे पासून ‘या’ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी राहणार बंद

रत्नागिरी – पेट्रोल पंप ’14 मे’ पासून दर रविवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात येणार आहेत. फामपेडा या संघटनेशी संलग्न असलेल्या सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हरयाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत आणखीही काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘मन की बात’ मध्ये देशातील 125 कोटी भारतीयांनी आठवड्यातील 1 दिवस पेट्रोल/डीझेलचा वापर टाळून आयात कमी करण्यास, प्रदुषण कमी करुन हरीत पर्यावरण जोपासण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सर्व पेट्रोल पंप असा निर्णय घेण्यात आला.

तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुदुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणातील सुमारे 20 हजार पेट्रोलपंप रविवारी चोवीस तास बंद राहतील. पेट्रोल पंप व्यवसायातील प्रस्तावित बदलाची नोंद घेणे, सर्व स्टाफला प्रशिक्षित करणे, ग्राहकांना माहिती देणे, तसेच इतर कामांनिमित्त बुधवार दि. 10 मे रोजी एक दिवस खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डीलर मार्जिनचा मुद्दा सुटेपर्यंत मनुष्यबळ, विज खर्च आणि इतर खर्चामध्ये बचत करण्यासाठी सोमवार 15 मे पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत फक्त एकाच शिफ्टमध्ये कामकाज करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, अशी माहिती लोध यांनी दिली.

 

COMMENTS