पासपोर्ट काढणे आता आणखीन सोपं होणार आहे. कारण 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने सुरूवात करण्याची तयारी केली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा केली आहे. याआधी देशात एकूण 77 पासपोर्ट कार्यालय आहेत. त्यातच आता नव्या 149 पासपोर्ट कार्यालयाची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 86 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्या टप्प्यात उर्वरित पासपोर्ट केंद्र उभारली जाणार आहे. सुषमा स्वराज यांनी याबाबत सांगितलं की, केंद्र सरकारने एक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं असून, कोणालाही पासपोर्ट बनवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त दूर जावं लागू नये. तिसऱ्या टप्प्यात आणखी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
यातील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 86 पीओपीएसके सुरु करण्यात येणार आहेत. हे परराष्ट्र खातं आणि पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात येणार आहेत.
COMMENTS