मुंबई – राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी अपक्ष आमदारांचीही मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रामटेक आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आशीष जैस्वाल आणि नरेंद्र गोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान रामटेक विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आशीष जैस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार नरेंद्र गोंडेकर हे दोघे 2009 मध्ये शिवसेनेचेच आमदार होते. परंतु या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जैस्वाल आणि गोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर आता हे दोन्ही आमदार शिवसेनेल पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS