2018 अखेरपर्यंत देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वाय-फाय सुविधा !

2018 अखेरपर्यंत देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वाय-फाय सुविधा !

नवी दिल्ली- केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार असल्याची माहिती दुरसंचार सचिव अरुणा सुंदराजन यांनी दिला. अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.

 

इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्स व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि सरकारी कंपनी बीएसएनएलच्या मदतीने या योजनेला पूर्ण केलं जाणार आहे. हायस्पीड आणि स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे, असेही अरूणा सुंदराजन यावेळी म्हणाल्या.

COMMENTS