2019च्या लोकसभा  निवडणुकांसाठी भाजपची 600 जणांची टीम सज्ज

2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची 600 जणांची टीम सज्ज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे.  अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची  टीम तयार करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या 543 मतदारसंघात प्रत्येकी एक कार्यकर्ता कार्यरत असणार आहे. तर विभागनिहाय पाच मतदारसंघांसाठी एक कार्यकर्ता निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत काम करणारी 600 जणांची टीम तयार  आहे.

अमित शहा स्वत: या सर्व कार्यकर्त्यांवर नजर ठेवणार असून गुजरात, ओडिशा, तेलंगणा, लक्षद्वीप आणि पश्‍चिम बंगाल येथे बूथ स्तरावरील व्यवस्थापनही करणार आहेत. शहा  प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 15 दिवस मुक्काम करणार आहेत.  सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी शहा पुढील तीन महिने संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत.

COMMENTS