दिल्ली – देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घ्यावी या चर्चेला पुन्हा एकदा वेग आलाय. आता नीती आयोगानं 2024 पासून देशात एकत्र निवडणूक घ्यावी अशी सूचना केलीय. या निवडणुका दोन टप्प्यात व्हाव्यात असंही नीती आयोगानं स्पष्ट केलंय. निवडणुक आयोगाला नोडल एजन्सी बनवत त्यांना या सुचना करण्यात आल्या आहेत. तसंच यासंदर्भात सर्व संबधितांचा एक ग्रूप तयार करुन त्यांनी सर्वांनी मिळून त्याच्यासाठी रोडमॅप तयार करावा असंही नीती आयोगानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित निवडणुकीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनीही याचं प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नीती आयोगाने ही सुचना केल्यानंतर आता एकत्रित निवडणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.
Newer Post
आजपासून देशभरात ‘रेरा’ कायदा लागू! Older Post
भाजपचा खासदार अडकला हनी ट्रॅपमध्ये !
COMMENTS