500 रुपयांची नवी नोट चलनात येणार

500 रुपयांची नवी नोट चलनात येणार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नवी नोट जारी केली आहे. या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले आहे. 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचे ए (A) अक्षर लिहिले आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या दोन्ही नंबर पॅनलवर हे अक्षर छापलेले आहे.
नोटांच्या छपाईचे वर्ष 2017 आहे. या नोटांचे इतर फीचर्स हे नोटाबंदीनंतर जारी केलेल्या नोटांप्रमाणेच आहेत. 8 नोव्हेंबरनंतर जारी केलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात असतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या ट्विटर हॅण्डलवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS