8 डिसेंबरपासून नारायण राणे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर

8 डिसेंबरपासून नारायण राणे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर

मुंबई –  नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्षबांधणी आणि विस्तारावर लक्ष केंद्रित केले असून येत्या 8,9 आणि 10 डिसेंबर रोजी ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौ-यात पक्षाच्या विस्ताराबरोबरच विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला ते काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसमुक्त झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर आहेत. महाराष्ट्राचा दौरा करून त्या सर्वाशी संवाद साधत असतानाच राजकीय रणनीती आखली जाणार आहे. त्यांच्या दौ-याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून केली जाणार आहे.

पक्ष विस्ताराच्या दौ-यात नारायण राणे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात दौरा करणार आहेत. यावेळी पक्ष स्थापनेमागची भूमिका, पक्षाची पुढील दिशा, पक्ष विस्तारासाठीचे नियोजन याबाबत ते कार्यकर्त्यांना आपली भूमिका सांगणार आहेत.

 

COMMENTS