18 खासदारांच्या शिवसेनेला 1 मंत्रिपद, 3 खासदारांच्या जेडीयूला 2 मंत्रिपदे ?

18 खासदारांच्या शिवसेनेला 1 मंत्रिपद, 3 खासदारांच्या जेडीयूला 2 मंत्रिपदे ?

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीतल संभाव्य प्रतिस्पर्ध्याला आपल्या गोटात खेचल्याने ते भलतेच खूश झालेत. त्यामुळेच पुढील महिन्यात होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जेडीयूला सामावून घेतलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये जेडीयूला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  जेडीयूचे लोकसभेत फक्त 3 खासदार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असतानाही त्यांना केवळ आतापर्यंत 1 मंत्रीपद दिलं गेलं आहे. तेही केवळ अवजड उद्योग खातं जे तुलनेत कमी महत्वाचं आहे. त्यामुळे पुढील महिन्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारात जेडीयूच्या दोन मंत्र्यांची वर्णी लागली तर शिवसेना त्यावर काय भूमिका घेते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

COMMENTS