विधान परिषद – लेखी प्रश्नोत्तरे

विधान परिषद – लेखी प्रश्नोत्तरे

1) ……..राजापूर तालुक्यात नाणार – सागवे परिसरमधील 14 गावांत केंद्र – राज्य शासनाची भागीदारी असलेला 13, 600 एकरवर सुमारे दोन लाख कोटींचा जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आला असून जून 2017 मध्ये याबाबतची अधिकसुचना जाहीर झाली आहे.

 

यामध्ये सर्व बाधित संबंधितांना वैयक्तिक नोटिसा देवून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

2)…..धनगर समाज आरक्षण — याबद्दलचा सामाजिक व मानववंशीयशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चा अभ्यास सुरू असून याबाबतचा अहवाल डिसेंबर 2017 पर्यंत येणे अपेक्षित आहे.

 

3)….राज्यात जात प्रमाणपत्र व जात पडताळणीबाबतची एकूण 43,122 प्रकरणे प्रलंबित आहेत.

 

4)….. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसार

 

विना मीटर कृषी ग्राहक वीज दरांत 2017-18 ला 5.2%, 2018-19 5.2%, 2019 -20 4.6 %

 

मीटर असलेल्या कृषी ग्राहक वीज दरांत 2017-18 ला 3.5 % , 2018-19 ला 3.4 % तर 2019-20 ला 4.2 % वाढ होणार आहे.

 

5)…. उद्योग संचालनालय  जिल्हा स्तरावरील अभिलेख्यानुसार 4 थ्या औद्योगिक प्रगणनेत राज्यात 34, 327 लघुउद्योग बंद पडलेले आहेत.

 

 

6)…..राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये 2001-2016 या पंधरा वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे 1 हजार 77 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज विधानपरिषदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली .

 

आदिवासी आश्रमशाळांमधले विद्यार्थ्याचे मृत्यू रोखण्यासाठी  सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली .आश्रमशाळांमधले मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती , या समितीने सुचवलेल्या शिफारसी सरकार अंमलात आणत असल्याचं सावरा यांनी सांगितलं .

 

जिल्हाधिकारी स्तरावर आढावा गटाची स्थापना, जेवणाच्या वेळेत बदल, पालकांचं संमतीपत्र,किमान क्रीडा सुविधा, मादक पदार्थ सेवन मनाई, आरोग्य तपासणी यांसारख्या शिफारसी साळुंखे समितीने सुचवल्या आहेत .

 

 

 

COMMENTS