राज्यातील 41 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

राज्यातील 41 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

ज्या पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या  41 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात येणार आहे.    मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम मल्लिकार्जुन प्रसन्न, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, लाचलुचपत विभागाचे विशेष महानिरीक्षक केशव पाटील यांना पदक प्रदान करण्यात येणार आहे. आज (सोमवारी) राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली.

पदकवीर पोलिसांची नावे खालीलप्रमाणे –

मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रतापसिंह पाटणकर ( विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर विभाग), केशव पाटील ( विशेष महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अंकूश शिंदे (अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर शहर), बळशीराम गायकर (पोलीस उपायुक्त, पुणे शहर), डॉ. प्रभाकर बुधावंत (पोलीस अधीक्षक, पुणे), अनिल कुंभारे (पोलीस उपायुक्त, मुंबई), महेश घुर्ये( कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल), दिलीप सावंत (पोलीस उपायुक्त, सीआयडी, मुंबई), राजेंद्र डहाळे (पोलीस अधीक्षक, नंदुरबार), निसार तांबोळ (कमांडंट, राज्यराखीव पोलीस दल- औरंगाबाद), अनिल आकडे (पोलीस उपअधीक्षक, वसई), नागनाथ कोदे (सहाय्यक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर), जयराम मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई), सर्जेराव पाटील (पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण), सुधीर कालेकर (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-१, मुंबई), विनायक वस्त (पोलीस निरीक्षक, सीआयडी, खंडणीविरोधी पथक, मुंबई), सुभाष सावत (पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई), विवेक मुगलीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे, पुणे), मधुकर कड (पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक), बजरंग कापसे (सहाय्यक पोलीस निरीक्ष, सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर), प्रकाश पोतदार (पोलीस उपनिरीक्षक, सिंदखेड, धुळे), विजय टक्के (पोलीस उपनिरीक्षक,एसआयडी, मुंबई), रामचंद्र कानडे (पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी यूनिट १२, दहीसर), दिलीप रतन माळी (पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे), सुनील चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफएस, सोलापूर), राजकुमार माने (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर, पुणे), कैलास शंकर मोहोळ (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड, पुणे), प्रकाश नाईक (सहाय्यक पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ, पुणे), रौफ शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर), मोजोद्दीन कदार शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपतविरोधी पथक, जळगाव), सदाशिव शिंदे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, पुणे), मदन गीते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जालना), लक्ष्मण गायकवाड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी यूनिट-६, मुंबई), सुरेश जगताप (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग, पुणे), नंदकिशोर परदेशी (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, जालना), धनराज चव्हाण (हेड कॉन्स्टेबल, जळगाव), रघुनाथ शामराव फुके (औरंगादाबाद), राम बागम (हेड कॉन्स्टेबल, मुंबई), प्रकाश लांघे (हेड कॉन्स्टेबल, पुणे शहर) या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पदकाने सम्मान करण्यात येणार आहे.

 

COMMENTS