देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. तिरंग्याचा अपमान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असताना, भाजपा खासदाराने मात्र उलटा झेंडा फडकावला आहे. प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये रेखा वर्मा उलटा तिरंगा फडकावत असून, फोटो काढून घेत असताना दिसत आहेत.
भाजपा गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तिरंगा यात्रा काढत आहे. रेखा वर्मा यांनीही सितापूरमधील महोली परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र तिरंगा उलटा फडकावल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कायद्यानुसार एखादी व्यक्ती राष्ट्रचिन्ह तसंच राष्ट्रध्वदाचा तोंडी किंवा लिखीत अपमान करत असेल तर त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतो. यामध्ये काही तांत्रिक बाबीही आहेत. खासदार रेखा वर्मा यांच्यावर कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते का हे पहावं लागेल.
COMMENTS