‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतर्फे प्रसिध्द केलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

★ काय आहे  महाराष्ट्र वार्षिकी 2017 ?

महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश

महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये,

भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती

महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी

पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांख्यिकी माहिती, वैशिष्टये,

शिक्षणसंस्था, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग, पर्यटन स्थळे

राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती

विभागांचे उद्देश व कार्य, रचना,

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना,

मंत्री, सचिव आणि विविध विभागांचे संपर्क क्रमांक

मंत्रीमंडळ निर्णय

महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम,

शासकीय कार्यक्रम,

शासनाचे पुरस्कार

महाराष्ट्राची मानचिन्हे,

महाराष्ट्रातील भारतरत्न

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर,

राज्याचे आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य

केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ,

देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य यादीचाही समावेश आहे.

 

 

 

 

 

COMMENTS