राजकीय स्वार्थासाठी सरकारने हरियाणा जळू दिले, हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे

राजकीय स्वार्थासाठी सरकारने हरियाणा जळू दिले, हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे

बाबा राम रहीम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काल हरियाणात प्रचंड हिंसाचार झाला. यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून. या हिंसाचारासाठी  हायकोर्टाने हरियाणा सरकारवर ताशेरे ओढले.

पंचकुला आणि अन्य शहरांमधील हिंसाचारावरुन पंजाब- हरियाणा हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारले. राजकीय फायद्यासाठी हिंसाचार होऊ दिला असे हायकोर्टाने खट्टर सरकारला सुनावले आहे. सरकारची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा असे हायकोर्टाने सांगितल्याने सरकारची कोंडी झाली होती.

‘राजकीय स्वार्थासाठी मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा जळू दिलं’ अशी टीका हायकोर्टाने केली आहे. ‘सरकार आंदोलकांना शरण गेलं असं दिसंतय’ असंही हायकोर्ट म्हणाले. याच पार्श्वभूमीवर खट्टर यांना भाजपश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं आहे. खट्टर यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येतोय.

दरम्यान, हरियाणा प्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शाह, हरियाणा प्रभारी महासचिव अनिल जैन आणि कैलाश विजयवर्गीय यांची भाजपा मुख्यालयात बैठक  घेण्यात आली आहे.

COMMENTS