“…. तर काँग्रेसच्या एकाही नेत्याला जिल्ह्यात फिरु देणार नाही”

“…. तर काँग्रेसच्या एकाही नेत्याला जिल्ह्यात फिरु देणार नाही”

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन बैठका आज आयोजित करण्यात आल्या होत्या. एक बैठक नारायण राणे यांनी बोलावली होती. तर दुसरी बैठक प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

राणे यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत हजेरी लावली. तेंव्हा त्या बैठकीच्या आयोजकांना नितेश राणे यांनी चांगलं धारेवर धरलं. नारायण राणे यांना विश्सात न घेताच ही बैठक कशी लावली. राणे हे आमचे दैवत आहे. त्यामुळे राणे यांना या बैठकीला का बोलवलं नाही. काही जण काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राणे साहेबांना विश्वासा न घेता अशी बैठक पुन्हा बोलावली तर काँग्रेसच्या एकाही नेत्याला जिल्ह्यात फिरु देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

 

COMMENTS