उमेदवारी न मिळाल्यास आत्महत्या करीन, भाजप कार्यकर्त्याचे पत्र

उमेदवारी न मिळाल्यास आत्महत्या करीन, भाजप कार्यकर्त्याचे पत्र

नांदेड – उमेद्वारी न मिळाल्यास आपण आत्महत्या करू, असा इशाराच चक्क एका भाजप कार्यकर्त्याने दिला आहे. सिद्धार्थ भिमराव कसबे  असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. कसबे यांनी कामगार कल्याण मंत्री तथा पक्षाचे निवडणूक प्रभारी संभाजी पाटील निलंगेकर यांना पत्रही लिहिले आहे.

कार्यकर्ते आणि  पदाधिकारी आपल्याला पक्षाकडून उमेद्वारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करतात. वेळप्रसंगी शक्तीप्रदर्शनही केले जाते. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. नांदेड महापालिकेच्या वार्ड क्रमांक 8 मधून इच्छूक असलेले उमेद्वार सिद्धार्थ भिमराव कसबे यांनी भाजपकडून उमेद्वारी मिळावी यासाठी कामगार कल्याणमंत्री व पक्षाचे निवडणूक प्रभारी संभाजी पाटील निलंगेकर यांनाच आत्महत्येचा इशारा देणारे पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्याला उमेद्वारी न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. जर असे झाले तर यास कारणीभूत कोअर कमिटी असेल, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

COMMENTS