नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिलांच्या राखीव जागाविषयीचे विधेयक तातडीने मुंजर करण्याची विनंती केली होती. यानंतर भाजपने म्हंटले आहे कि, आमचे सरकार हे विधेयक आणण्यासाठी कटिबध्द आहे. सोनिया गांधी पत्र लिहून हे विधेयक पारित करण्याचे श्रेय स्वतःला घेऊ इच्छितात, असा आरोप भाजपने सोनिया गांधी यांच्यावर केला आहे.
जर सोनिया गांधी यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत एवढी चिंता होती तर त्यांनी समाजवादी पक्ष आणि राजद सारख्या पक्षांना पत्र का नाही लिहले जे या विधेयकाला विरोध करत होते, असाही प्रश्न भाजपने सोनिया गांधींना विचारला आहे.
COMMENTS