सर्व कोकणी माणसाला माझा मनापासून एक प्रश्न ?
कोणी तरी सांगा सन्माननीय नारायण राव राणे ह्यांचं चुकले तरी काय ?
१) कोकणात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करून विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली हि त्यांची चूक होती का ?
२) लाॅ कॉलेज सुरु केले कोकणात हि त्यांची चूक होती का ?
३) ऍग्रीकल्चर कॉलेज सुरु केले हे त्यांचं चुकले का ?
४) माझ्या कोकणात विमानतळ व्हावे ह्यासाठीच केलेला प्रयत्न व स्थानिकांना त्यातून मिळणारा रोजगार हि त्यांची चूक होती का ?
५) सिंधुदुर्ग महिला भवन उभारणी करून त्यातून महिला ना रोजगार देऊन महिला सक्षमीकरणावर भर दिला हि त्यांची चूक होती का ?
६) नारायण राणे पालकमंत्री असताना सध्याची असलेली परिस्थिती निदान तशी तरी नव्हती .कारण प्रशासनावर वचक होता हि त्यांची चूक होती का ?
७) कोकणात वृद्धाश्रम बांधले हि त्यांची चूक होती का ?
८) नितेश राणे ह्यांनी एका दिवसात २५००० युवकांना रोजगार देऊन त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली हि त्यांची चूक होती का ?
९) कोकणात ले पहिले मेडिकल कॉलेज ची उभारणी केली हि त्यांची चूक होती का ?
१०) महाराष्ट्रातील कदाचित मोठंच म्हणावे लागेल असे भव्य हॉस्पिटल बांधून आज कोकणी माणसाला उपचारासाठी मुंबई कोल्हापूर येथे जावे लागणार नाही हि त्यांची चूक होती का ?
११) त्या हास्पिटल मधून कित्येक अश्या कोकणातील युवक युवतींना .महिलांना .पुरुषांना त्यातून रोजगार उपलब्ध करून देणे हि त्यांची चूक होती का ?
१२) सी वर्ल्ड प्रकल्प सुरु करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन च्या दृष्टीने महत्व प्राप्त करून दिले हे त्यांचं चुकले का ?
१३) गो शाळा सुरु करण्याची त्यांची संकल्पना आहे लवकरच ती हि होईल हि त्यांची चूक आहे .
१४) दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा लॅप टॉप सारख्या वस्तू देऊन गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हि त्यांची चूक होती काय ?
१५) तातू राणे ट्रस्ट तर्फे कित्येक अश्या गरजू मुलांचा शिक्षणाचा खर्च व गरजू रुग्णांच्या उपचाराचा खर्च करणे हि त्यांची चूक होती का ?
१६) कोकण म्हटले कि राणे हि ओळख उगाच नाही काही तरी केलं त्या माणसाने हि त्यांची चूक आहे का ?
१७) १०० रुपयात कोकणी माणसासाठी विशेष बसेस सोडण्यात येतात स्वाभिमान तर्फे हि त्यांची चूक होती का ?
१८) आज पर्यंत लोकांचा अनुभव आहे राणे कडे कुठले हि काम घेऊन गेले कि काम होते हा दरारा कायम ठेवणे हि त्यांची चूक होती का ?
१९) नितेश राणे ह्यांची मराठा समाज साठी असलेली तळमळ पूर्ण महाराष्ट्राने पाहिली हि समाजासाठी लढाई करणे हि त्यांची चूक होती का ?
अजून खूप काही आहे जे नारायण राणे ह्या व्यक्तीने केलं आहे
फक्त एक शिवसेना पक्ष सोडला म्हणून त्यांना दोष देणे हे बरोबर आहे का ?
जिथे अन्याय होत असेल तिथे अपमान करून राहणे मराठ्यांना तरी शोभत नाही मग तिथून बाहेर पडणे हि राणेंची चूक आहे का ?
केसरकर राष्ट्रवादी मधून सेनेत आणि वैभव नाईक आधी काँग्रेस मग शिवसेना मग त्यांना दलबदलू काही न बोलता फक्त नारायण राणे ह्यांनाच विरोध कशाला ?
जर कोकणचा विकास पूर्ण पणे ठप्प असताना आक्रमक पणे भूमिका मांडणे चूक आहे का ?
जर त्यांच्या भाजप मधेय किंवा इतर पक्षात जाण्याने कोकणचा ठप्प झालेला विकास पुंन्हा होत असेल तर काय चूक आहे त्यात.?
एकीकडे बारामतीकर नेहमी त्यांच्या नेत्याला साथ देतात ..बीड परळी वाले त्यांच्या नेत्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात.जळगाव वाले त्यांचा नेत्याच्या पाठिशी ठाम पणे उभे राहतात …
मग आज आपण प्रत्येक कोकणी माणसाने नारायण राणे ह्या कोकणी नेत्याच्या पाठीशी ठामपणे का उभे राहू नये ?
आपण त्यांचा पराभव करून ज्यांना संधी दिली त्यांनी सत्तेत असून मागील ३ वर्षात काय केलं हे कोणी तरी सांगावे ….
किंवा त्यांनी केलेलं एक तरी विधायक काम सांगावे कोणीतरी …
नारायण राणे ह्यांची साथ देयाची कि नाहीं हे तुम्हीच ठरवा ..
कृपया विचार करा पटलं तर घ्या नाही तर सोडून दया ..
नितेश राणे
COMMENTS