पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला ?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्यसभा खासदार मुकूल रॉय यांनी आज राजीनामा दिला आहे.  त्यांनी आज तडकाफडकी पक्षाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला. तसेच दुर्गा पुजेनंतर आपण राज्यसभेतील खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांच्याकडून मिळत असणारी दुर्लक्षित वागणूक मुकूल रॉय यांच्या राजीनाम्यामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. मुकूल रॉय म्हणाले की,  डिसेंबर 1997 रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी मी पहिली स्वाक्षरी केली होती. मात्र, आज मोठ्या जड अंत:करणाने मी पक्षापासून विलग होण्याचा निर्णय घेत आहे. दुर्गा पुजेनंतर मी यामागील कारणे स्पष्ट करेन, असे त्यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मुकूल रॉय स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

COMMENTS