मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावला असून 33 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा. हि अतिशय दुर्दैवी घटना आहे. असे चव्हाण म्हणाले.
या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 29, 2017
#Elphinstone
एल्फिन्स्टन-परळ चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू हि अतिशय दुर्दैवी घटना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 29, 2017
एलफिन्स्टन-परळ रेल्वे दुर्घटने बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपल्याला या घटनेने धक्का बसला असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेची महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी केली जाईल तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
Saddened and shocked to know about the tragic stampede at #Elphinstone railway station, foot over bridge.#Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2017
परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती लाभो, जखमी झालेल्या प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
My deepest condolences to all those who have lost their lives due to the stampede in Mumbai. Prayers with those who are injured.
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2017
मुंबई में भगदड़ के हादसे से गहरा दुःख हुआ। शाेक संतप्त परिवारों के प्रति संवेदना; घायलों के लिए प्रार्थना—राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) September 29, 2017
COMMENTS