भाजप आणि विरोधीपक्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये – राऊत

भाजप आणि विरोधीपक्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये – राऊत

 आम्ही सरकारला विरोध करतो कारण सत्तेत असूनही जनतेच्या मनातली खदखद शिवसेनेनेच बाहेर आणली. विरोधी पक्ष केवळ बघ्याची भूमीका घेत आहे. त्यामुळे राज्यात भाजप आणि विरोधीपक्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यासाठी संजय राऊत यांनी आज सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, देशातील वातावरण पाहता निवडणूक लवकर होईल असं वाटतंय, त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जरी एकत्र झाल्या तरी शिवसेना त्याला तयार आहे. कारण मंत्रीमंडळ विस्ताराचे 19 मुहूर्त आले आणि गेले त्यात शिवसेनेला डावलले गेले. त्यामुळे विधानसभा निवडणूक कधी होईल हे मोदीच सांगू शकतात.

COMMENTS