भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लंडनमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली. अटकेनंतर काही मिनिटातच त्याला जामीन देखील मिळाला.
भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळून गेला होता. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरू होते. मल्ल्याला या वर्षभरात अटक केल्याची ही दुसरी वेळ आहे. एप्रिल 2017 मध्ये भारताच्या तक्रारीवरून स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली होती. अवघ्या काही मिनिटांत त्याला जामीन मिळाला होता. त्याच्या विरोधात लंडन कोर्टात सुनावणी सुरू होती.
COMMENTS