विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील 5 ऑक्टोबरला यवतमाळच्या दौ-यावर !

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील 5 ऑक्टोबरला यवतमाळच्या दौ-यावर !

मुंबई – विषबाधा पीडित शेतकरी कुटुंबांच्या भेटीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार (5 ऑक्टोबर)  रोजी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

नियोजित वेळापत्रकानुसार विखे पाटील दुपारी 12.20 वाजता कळंब तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाची भेट घेतील, त्यानंतर दुपारी 2 वाजता ते यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या शेतक-यांची विचारपूस करतील. या दौ-यामध्ये ते शासकीय अधिका-यांना भेटून परिस्थितीची माहिती घेणार आहेत. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेते व प्रमुख पदाधिका-यांशीही ते चर्चा करणार आहेत.

 

COMMENTS