मोदींवर टीका करणं ‘या’ अभिनेत्याला पडलं महागात, कोर्टात तक्रार दाखल !

मोदींवर टीका करणं ‘या’ अभिनेत्याला पडलं महागात, कोर्टात तक्रार दाखल !

दक्षिणेतील अभिनेते प्रकाश राज यांना पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं महागात पडलंय. मोदींवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर लखनऊ कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका वकीलानं तक्रार दाखले केली आहे. यावर आता येत्या 7 तारखेला सुनावणी होणार आहे.

                 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अक्टर आहेत, मला मिळालेले 5 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना द्यायला हवेत असं वक्तव्य प्रकाश राज यांनी केलं होतं. तसंच  ‘मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. अच्छे दिन परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’ अशी टीका त्यांनी केली होती. बंगळूरुमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या टीकेवरुनही प्रकाश राज यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

COMMENTS