दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवील यांची तीन दिवसापूर्वी चोरीला गेलेली कार आज अखेर पोलिसांना सापडली आहे. गाजियाबादच्या मोहन नगरातून पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. कारमध्ये पोलिसांना तलवार सापडली आहे.
दिल्ली सचिवालयाबाहेर चोरी झाल्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी झाल्याच्यावेळी ही कार आम आदमी पक्षाच्या मिडीया विभागातील एक महिला वापरत होती. ‘त्याच रंगाची आणि मॉडेलची कार आम्हाला गाझियाबादमध्ये सापडली आहे. आम्ही इंजिन आणि इतर गोष्टी तपासत आहोत’, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या कारचा वापर करत होते. २०१३ मध्ये दिल्लीचे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हीच कार वापरली होती. आपल्या कॉमन मॅन इमेजला साजेशी गाडी म्हणून या कारचा केजरीवाल वापर करत. एका अनिवासी भारतीयाने भेट दिलेली कार 2014 साली प्रकाशझोतात आली होती. त्यावर्षी दिल्ली पोलिसांविरुद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान केजरीवाल यांनी ही कार झोपण्यासाठीदेखील वापरली होती. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान केजरीवाल याच कारमधून दौरा करीत असत.
Blue Wagon R car which was earlier used by Arvind Kejriwal and had been stolen on Oct 12 has been recovered from Ghaziabad pic.twitter.com/MFgvvrUdWe
— ANI (@ANI) October 14, 2017
COMMENTS