मनसेतील एकमेव नगरसेवकांची लाचलुचपत विभागाकडे तक्रार !

मनसेतील एकमेव नगरसेवकांची लाचलुचपत विभागाकडे तक्रार !

मुंबईतल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर आता मनसेमध्ये केवळ एकच नगरसेवक उरला आहे.  मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप तुर्डे यांनी केलाय. तत्कालीन मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी प्रलोभन दाखवल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नगरसेवक फोडण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संजय तुर्डे यांनी केली आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितले, असे संजय तुर्डे म्हणाले होते.

COMMENTS