शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ,  मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक !

शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ,  मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक !

मुंबई – शेतकरी कर्जमाफीची सावळ्या गोंधळाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या  कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ असल्याचं आता समोर आलं आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जापैकी 30 ते 35 टक्के माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे. चार चार अर्जांसाठी एकच आधार नंबर वापरल्याचंही समोर आलं आहे. तसंच बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नाही. शेतक-यांवर असलेले कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीमध्येही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं पुढं आलं आहे. बँकांनी जी माहिती दिली ती आम्ही भरली असा आयटी विभागाचा दावा आहे. सर्व माहिती घाईघाईत मागवल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं बोलंलं जातंय. दरम्यान या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून आज या प्रकरणी महत्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे.

COMMENTS