गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार ? काय सांगतो ओपीनियन पोल ? वाचा सविस्तर

गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार ? काय सांगतो ओपीनियन पोल ? वाचा सविस्तर

इंडिया टुडे आणि अक्सिस यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 182 जागांपैकी भाजप 110 ते 125 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 57 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी यांनी मदत केली तरी एवढ्याच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हार्दिक पटेल यांनीही पाठिंबा दिल तरीही केवळ 62 ते 71 जागाच मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे भाजपविरोधात मोठी नाराजी असली तरी त्याचा फायदा काँग्रेसला करुन घेता येत नसल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणूनही विजय रुपानी यांचा सर्वाधिक पसंती आहे.

इंडिया टुडे आणि अक्सिस यांनी घेतलेल्या ओपीनियन पोलमध्ये हिमाचल प्रदेशातही कमळ फुळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण 68 जागांपैकी तब्बल 43 ते 47 जागा भाजपला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण मतांच्या टक्केवारीत भाजपला जवळपास 49 टक्के मिळण्याची शक्यता आहे.  तर काँग्रेसला 38 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचे पसंतीचे उमेदावर म्हणून काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री विरभद्रसिंग यांनाच सर्वाधिक पसंती आहे. जवळपास 31 टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. तर भाजपकडून सर्वाधिक पसंती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना आहे. त्यांना 24 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.

COMMENTS