शिमला – हिमाचल प्रदेश निवडणुकीचं वातावऱण चांगलंचं तापलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी काल एका प्रचार सभेत जोरदार फटकेबाजी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे विजयी झाल्याचं धुमल यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचं पारडं जड होतं. सर्वच जण हिलरी क्लिंटन जिंकतील असं म्हणत होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदींच्या उल्लेख केला. भारतात नरेंद्र मोदींनी ज्या प्रमाणे विकास केला त्या प्रमाणे मी अमेरिकेत करीन असं आश्वासन दिलं. त्यामुळे ट्रम्प जिंकले असा दावाही धुमल यांनी केला आहे. नवभारत टाईम्स या वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे.
COMMENTS