उसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी, राजू शेट्टींची मागणी, काय आहेत ऊस परिषदेतील इतर ठराव !

उसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी, राजू शेट्टींची मागणी, काय आहेत ऊस परिषदेतील इतर ठराव !

कोल्हापूर – ऊस उत्पादक शेतक-यांना यंदा विनाकपात, एकरकमी 3400 रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये करण्यात आली. तसा ठराव ऊस परिषदेमध्ये करण्यात आला. या ठरावासह महत्वाचे ठराव काय आहेत ते पाहूयात…..

 

  1. उस उत्पादक शेतक-यांना सन 2017- 2018 या चालु गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी 3400 रुपये देण्यात यावे.

2     देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन शेतक-यांना संपुर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा दिडपट हमी भाव  मिळावा.

  1. ज्या साखर कारखानदारांनी वारंवार आदेश देवुन देखील एफ.आर.पी दिलेली नाही..त्याच्यावर फौजदारी दाखल करावी.
  2. राज्याच्या सर्व साखर कारखानाच्या गेटवर आणि गोडावुन मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवुन सर्व साखर कारखान्याचे गोडावुन आणि वजन काटे ऑनलाईन करण्यात यावे

 

  1. राज्य सहकारी बॅकेकडडुन साखर कारखान्यांना देण्यात येणारी कर्जस्वरुपात उचल 90 टक्के द्यावी

 

  1.  राज्यात परतीच्या पावासानं पळे, भाजीपाला आणि पिकांचे मोठ्याप्रमाणात आर्थीक नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी

 

  1.  आधारभुत किमंतीवर भात, सोयाबीन, मका, उडीद यांची खरेदी केंद्र शासनानं त्वरीत सुरु करावीत.

 

  1.  उस तोडणी मजुर महामंडळाला शासनानं निधी उपलब्ध करुन द्यावं.

 

  1.  शेतक-यांच्या टॅक्टर व ट्रॉलीला व्यावसायिक समजुन त्याला रोड टॅक्स लावु नये, तसच टॅक्टरवरील 12 टक्के जी.एस.टी असलेली 6 टक्के करावी.

 

  1.  भारनियमन त्वरीत रद्द करुन शेतीपंपाला विनाकपात 12 तास वीज देण्यात यावे.

COMMENTS