पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील तेजस संजय गायकवाड या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उल्लेख स्वतःहा पंतप्रधान मोदी यांनी केला. असून त्याने केलेल्या संकल्पनेची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी दिले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वर्षी सैनिकांन बरोबर दिवाळी साजरी करतात, सियाचिन पंजाब , हिमाचल प्रदेश आणि या वर्षी ते कश्मिर मधील गुजेर सेक्टर मध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने सैनिकांना मिठाई चारुन दिवाळी साजरी केली.
यावरुन तेजस गायकवाड यांने आमच्याही घरच्या दिवाळीच फराळ सीमेवरील सैनिकांना पोहचेल का ?अशी व्यवस्था होईल का ? हा विषय मी नरेंद्र मोदी अँप वरती मांडला. आणि या विषयाचा उल्लेख पंतप्रधानांनी 37 व्या ” मन की बात” या कार्यक्रमातून रविवारी 29 ऑक्टोबरला झाला.
गायकवाड हा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंड्ळाच्या कला विद्न्यान आणि वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. मला विश्वास आहे की, पुढच्या वर्षी आपण आपल्या घरी तयार केलेला गोडधोड फराळ सैनिंकांना पोहचवण्याची व्यवस्था सरकार करेल असा विश्वास गायकवाड या विद्यार्थ्यांने व्यक्त केला आहे.
तेजस गायकवाडचे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सचिव मुकुंद शहा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी अभिनंदन केले आहे . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नाव आज देशाच्या पंतप्रधानानी घेतले असल्याने परिसरात तेजस गायकवाडचे कौतुक होत आहे.
COMMENTS